googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi: आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

१२/०६/२०२३

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात


‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मेपासून कुसुम योजनेचे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
महाऊर्जा’मार्फत (Maha Urja) शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मेपासून कुसुम योजनेचे (Kusum-B Yojana) ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे.

तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्धीनुसार पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालय, नाशिकचे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.
१३ जानेवारी २०२१ रोजी १ लाख सौर कृषिपंप व ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील १ लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली.
राज्य शासनाकडून १२ मे २०२१ रोजी राज्यात या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी एक लाख नग या प्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये ५ लाख कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले.

या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.


 

कुसुम मधील सौरपंपांचा जिल्हानिहाय कोटा वाढणार आहे.
महाऊर्जाच्या (Mahaurja)

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार असून, योजनेची व ऑनलाइन अर्ज करण्याची सर्व माहिती 
महाऊर्जा  खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
www.mahaurja.com

सध्या राज्यात कुसुम सौर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहेत. अर्ज सुरू आहेत परंतु एकाच वेळी अनेक शेतकरी ही अर्ज भरण्यासाठी साइटवर भेट देत आहेत त्यामुळे क्षमतेपलीकडे जाऊन साईट स्लो होत आहे किंवा कधीकधी अनेक वेळा प्रयत्न करून देखील अर्ज भरला जात नाही. काही शेतकऱ्यांनी 100 रुपयांचे चलन पाच-सहा वेळा करूनही त्यांचा अर्ज भरला गेला नाही परिणामी शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

अर्ज सादर करत असताना शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्याला किती कोटा आहे, तसेच ऑनलाईन अर्ज सादर करत असताना तीन चार वेळेस पेमेंटचा भरणा केल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामधून जमा होते ती रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत नाही. जर रक्कम खात्यामधून वजा झाली तर शेतकऱ्यांना ओटीपी येण्यासाठी अडचणी येत आहेत यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा अर्ज सादर करत असताना आपले रजिस्ट्रेशन यापूर्वी झाले आहे असे नोटिफिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळते यासारख्या अनेक अडचणी महाऊर्जाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना येत आहे.

अनेक शेतकरी बांधवांनी याची तक्रार कुसुम महाऊर्जाकडे केली असता नवीन साईट अद्यावत करण्यात आली आहे. 
चलन देखील कमी करण्यात आले आहे त्यामुळे आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...