googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi

१२/०६/२०२३

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात


‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मेपासून कुसुम योजनेचे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
महाऊर्जा’मार्फत (Maha Urja) शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मेपासून कुसुम योजनेचे (Kusum-B Yojana) ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे.

तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्धीनुसार पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालय, नाशिकचे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.
१३ जानेवारी २०२१ रोजी १ लाख सौर कृषिपंप व ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील १ लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली.
राज्य शासनाकडून १२ मे २०२१ रोजी राज्यात या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी एक लाख नग या प्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये ५ लाख कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले.

या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.


 

कुसुम मधील सौरपंपांचा जिल्हानिहाय कोटा वाढणार आहे.
महाऊर्जाच्या (Mahaurja)

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B

या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार असून, योजनेची व ऑनलाइन अर्ज करण्याची सर्व माहिती 
महाऊर्जा  खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 
www.mahaurja.com

सध्या राज्यात कुसुम सौर पंपासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू आहेत. अर्ज सुरू आहेत परंतु एकाच वेळी अनेक शेतकरी ही अर्ज भरण्यासाठी साइटवर भेट देत आहेत त्यामुळे क्षमतेपलीकडे जाऊन साईट स्लो होत आहे किंवा कधीकधी अनेक वेळा प्रयत्न करून देखील अर्ज भरला जात नाही. काही शेतकऱ्यांनी 100 रुपयांचे चलन पाच-सहा वेळा करूनही त्यांचा अर्ज भरला गेला नाही परिणामी शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

अर्ज सादर करत असताना शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्याला किती कोटा आहे, तसेच ऑनलाईन अर्ज सादर करत असताना तीन चार वेळेस पेमेंटचा भरणा केल्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामधून जमा होते ती रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत नाही. जर रक्कम खात्यामधून वजा झाली तर शेतकऱ्यांना ओटीपी येण्यासाठी अडचणी येत आहेत यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा अर्ज सादर करत असताना आपले रजिस्ट्रेशन यापूर्वी झाले आहे असे नोटिफिकेशन त्या ठिकाणी पाहायला मिळते यासारख्या अनेक अडचणी महाऊर्जाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना येत आहे.

अनेक शेतकरी बांधवांनी याची तक्रार कुसुम महाऊर्जाकडे केली असता नवीन साईट अद्यावत करण्यात आली आहे. 
चलन देखील कमी करण्यात आले आहे त्यामुळे आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

३०/०४/२०२३

बँक ऑफ बडोदामध्ये भरणार 184 जागा. बँकेच्या वेबसाईटवर ११ मे पर्यंत करा ऑनलाईन अर्ज.

बँक ऑफ बडोदामध्ये भरणार 184 जागा. बँकेच्या वेबसाईटवर ११ मे पर्यंतच करा ऑनलाईन अर्ज. #रोजगार



ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 184 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपाध्यक्ष, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, MIS व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक, झोनल रिसिव्हेबल मॅनेजर, शाखा प्राप्य व्यवस्थापक, क्लाउड इंजिनीअर, Application आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, इंटिग्रेशन एक्सपर्ट, टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट, ऑफिस असिस्टंट आणि वॉचमन आणि गार्डनर पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 मे 2023 पर्यंतच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

 Online करा अर्ज:-

जाहीरात येथे पहा:-

२७/०४/२०२३

युरिया ठरतोय पिकासाठी वरदान! शेतकऱ्यांची होतेय आर्थिक बचत अन् मिळताहेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

*युरिया* 

नत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती करते. प्रकाशसंश्‍लेषणाद्वारे पिकाचे अन्न बनवण्यास मदत करते. यामुळे पिकाची झपाट्याने कायिक वाढ होते, चांगली फुले व फळे लागतात. पिकामध्ये प्रथिने तयार होण्यासाठी नत्र आवश्‍यक आहे.
 

युरियामध्ये ४६ टक्के नत्र असते. युरियामधील ४६ टक्के नत्र पिकाला किती मिळते हे वापरण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. ओल्या जमिनीत युरिया दिल्यानंतर त्याची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन अमोनियम तयार होतो. युरिया जर पारंपरिक पद्धतीने शेतात फेकून दिला, तर ही अभिक्रिया मातीवर म्हणजेच उघड्यावर होते. अमोनियमचे अमोनिया गॅसमध्ये रुपांतर होऊन तो लगेच हवेत उडून जातो. म्हणून युरिया नेहमी जमिनीत पेरून द्यावा.

अमोनियम हे अस्थिर संयुग असते. जमिनीत नैसर्गिकरीत्या आढळणारा नायट्रोझोमोनस जिवाणूच्या मदतीने तो नाइट्राईटमध्ये रुपांतरीत होतो. लगेच नायट्रोबॅक्‍टर जिवाणूच्या मदतीने नाइट्रेट तयार होते.

भात पीक सोडून इतर सर्व पिके नत्र फक्त नाइट्रेट स्वरुपातच घेतात. याचा अर्थ असा, की पीक अन्न म्हणून सरळ युरिया घेत नाही, तर नाइट्रेट घेते. या रुपांतरासाठी जमीन जिवंत असायला हवी.

जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर पाहिजे. त्यामुळे जमिनीत हवा आणि ओलाव्याचे योग्य प्रमाण टिकून राहते. उपयुक्त जिवाणू, बुरशी व इतर जिवांची चांगली वाढ होते. यासाठी रासायनिक खताबरोबर चांगले कुजलेले शेणखत, गांडूळखत, हिरवळीचे खते दरवर्षी जमिनीत मिसळावीत.

विघटित युरिया वाया जाण्याची कारणे

युरियाचे अमोनिफिकेशन होताना हवेशी संपर्क आला, की अमोनिया वायू तयार होऊन तो हवेत उडून जातो. या क्रियेला होलाटीलाईझेशन असे म्हणतात. हे नुकसान सर्वांत जास्त म्हणजे दिलेल्या युरियाच्या जवळपास ५८ ते ६० टक्के असते.

जेव्हा युरिया नाइट्रेट स्वरुपात येतो, तेव्हा पिकाची मुळे त्याला कोशिकांमध्ये शोषून घेतात. परंतु, जमिनीत जर ओल खूप जास्त असेल तर चल नाइट्रेट घटक मुळांपासून दूर खोल जमिनीत पाण्याबरोबर झिरपून जातो. याचे प्रमाण २० ते २२ टक्के आहे.

ज्या जमिनीला पाट पद्धतीने पाणी दिले जाते, तिथे चिखल तयार होतो. मातीतील हवेची जागा पाणी घेते. मुळांची अन्न व पाणी घेण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन ही सर्वोत्तम पद्धत आहे.

पिकांच्या मुळांबरोबर नत्रासाठी स्पर्धा करणारे काही जिवाणू जमिनीत राहतात. आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी जिवाणू नाइट्रेट शोषून घेऊन सेंद्रिय स्वरुपात रुपांतरीत करतात. पीक हे नत्र घेऊ शकत नाही याला इंमोबिलायझेशन म्हणतात. युरियामधील फक्त ३० ते ३५ टक्के नत्र पिकाला मिळते.

दाणेदार युरिया फायदेशीर ?

विशेष तंत्रज्ञान वापरून दाणेदार युरिया बनवितात. याचा दाणा टणक, २ ते ३ मिलीमीटर जाडीचा, पांढराशुभ्र, पावडरविरहीत असतो. प्रत्येक दाण्यावर फॉर्माल्डीहाइड नावाच्या मेणासारख्या घटकाचा लेप केलेला असतो. पारंपारिक युरियापेक्षा हा युरिया पिकाला कमी लागतो.

जमिनीत जास्तीचा ओलावा असला तरी हा युरिया हळूहळू विरघळतो. बारीक युरिया जास्तीत जास्त ७ ते ८ तासांत विरघळतो, तर जाड युरिया ३६ ते ३८ तास उपलब्ध असतो. जास्त वेळ उपलब्धता म्हणजे पिकाला नत्र शोषण्यासाठी जास्त कालावधी. यामुळे जाड युरियाची कार्यक्षमता तिपटीने वाढते.

जाड युरियाचा जेवढा भाग मातीच्या संपर्कात येतो, तेवढ्याच भागावरील फॉर्माल्डीहाइड मेणाचा लेप विरघळतो. त्यातून नत्र बाहेर पडते. जो भाग मातीच्या संपर्कात येत नाही, त्यावरील लेप तसाच राहतो, नत्र हवेत उडत नाही. त्यामुळे मोठे नुकसान टाळले जाते.

जाड दाणा पेरणीसाठी सोपा आहे. त्यात अजिबात पावडर नसते. त्यामुळे उभ्या पिकाला वापरताना पानावर पडून पाने जळण्याचा धोका नसतो.

युरियाचे नुकसान टाळून पिकाला नत्राची उपलब्धता वाढते. दिलेल्या खताचा पुरेपूर उपयोग होतो.

संतुलित खत मात्रा द्या

पिकांना संतुलित खत मात्रा द्यावी. म्हणजे पिकाची वाढीची अवस्था लक्षात घेऊन, सोळा अन्नघटकपैकी आवश्‍यक अन्नघटक योग्यप्रकारे, योग्य मात्रेत पिकाच्या मुळांच्या कक्षेत द्यावेत.

बागायती क्षेत्रातील पिकांना ठिबकद्वारे आणि कोरडवाहू क्षेत्रातील पिकांना फवारणीद्वारे शिफारशीत मात्रेमध्ये विद्राव्य खते द्यावीत. ८५ ते ९० टक्के विद्राव्य खते पिकाला लागू होतात, ही खते कमी प्रमाणात लागतात. ही खते हाताळणीस सोपे आणि किफायतशीर आहेत. १७ः४४ः००, १८ः१८ः१८, ०ः०ः५०, १२ः६१ः०, ०ः५२ः३४, १३ः०ः४५, १९ः१९ः१९ असे विद्राव्य खतांचे प्रकार उपलब्ध आहेत.

संपर्क : अशोक साकळे, ७७९८०९१२८८
(लेखक इफको मध्ये क्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत)
🙏🙏

२२/०४/२०२३

नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता या तारखेला शेतकर्‍यांना भेटणार आहे.

 शेतकर्‍यांना साठी एक आनंदाची बातमी आहे . नमो शेतकरी योजनेची तारीख ठरली आहे.


• तुम्हांला पहिला हप्ता मिळणार का ? 

नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे .

i) शेतकर्‍यांच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 जमीन नावावर असणे आवशयक आहे .

ii) शेतकरी Pm kisan योजनेचा लाभ घेत असलेला पाहिजे.

iii) शेतकर्‍याचे आधार बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे .

या शेतकर्‍यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता भेटणार आहे .

• पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?

पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

राज्यात असे 12 लाख शेतकरी असे आहेत, ज्यांचं बँक खातं अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाहीये.

त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ताबडतोड त्यांचं बँक खातं (ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात) आधार नंबर आणि फोन नंबरशी लिंक करून घ्यावं. नाहीतर त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळण्यास अडथळे येऊ शकतात.

• या तारखेला येणार पहिला हप्ता...

नमो शेतकरी महासन्मान निधि योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख ठरली आहे . पुढील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकर्‍यांना मिळणार आहे . 

पी एम किसान योजनेचा 14 हप्ता देखील मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे . म्हणजे शेतकर्‍यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता एकाच दिवशी मिळणार आहे .

नमो शेतकरी योजने अंतर्गत शेतकर्‍यांना वर्षाला 6000 हजार रुपये मिळणार आहे . या योजनेसाठी 96 लाख शेतकरी पात्र ठरणार आहे .

• आता शेतकर्‍यांना एकाच दिवशी 4000 रुपये खात्यात

शेतकर्‍यांना साठी खुशखबर आता शेतकर्‍यांना एकाच दिवशी नमो शेतकरी योजनेचे 2000 हजार आणि PM kisan योजनेचे 2000 हजार रुपये मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी बँक खात्यात जमा होणार आहे.

२१/०४/२०२३

जागतिक बाजारपेठेत साखरेचा नवा ऊच्चांक....

 साखरेच्या दराने जागतिक बाजारपेठेत एप्रिल  महिन्यामध्ये मागील बारा वर्षंतील ऊच्चांकी पातळी  गाठली आहे.


पांढर्या साखरेचा दर बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी,672    ङाॅलर प्रतिटन म्हणजेच भारतीय चलनात रू.(55,198) एवढा  नोंदवला गेला. भारताच्या साखर निर्यातीला खिळ बसल्याने      आणि थांयलंङ,चीन,मॅक्सिको,युरोप येथील साखरनिर्मितीत      मोठी घट झाल्यामुळे हे दर वाढले आहेत. परंतु केंद्र सरकार      कङून साखर निर्यातीसाठी कुठलीही संधी मिळण्याची शक्यता    मावळली आहे.

साखरेचा दर :- ( जागतिक साखर परिषदेच्या संकेतस्थळावरून, ISO)

https://www.isosugar.org/prices.php

• 01  मार्च  559.35
• 10  मार्च  583.75
• 20  मार्च  573.75
• 30  मार्च  623.15
• 03  एप्रिल 628.20
• 06  एप्रिल 667.50
• 12  एप्रिल 681.95
• 17  एप्रिल 661.40
• 19  एप्रिल 672.00


साखरेचे दर 2011 मघ्ये प्रतिटन (800 ङाॅलर) येथपर्यंत पोहचुन खाली आले होते.त्या पुढील बार वर्षंतील उच्चांक 19 एप्रिल ला नोंदवला गेला.क्रेंद सरकार सखार निर्यातीचा निण॔य घेतला आसता तर, कारखान्याने जागीच चारहजार आठशे (4,800) रू.प्रतिक्विंटल ने करार करता आले आसते. परंतु सघ्या तरी दराच्या वाढत्या आलेखाकङे बघत राहण्याची वेळ सघ्यातरी साखर कारखान्यांवर आलेली आहे.
देशात 357 लाख टन साखर निर्मीत होईल असा अंदाज करून,पहिल्या टप्यात 60 लाख टनांच्या निर्यातीची परवानगी दिली. पण, उत्तर प्रदेश चे माञ ऊखळ पांढरे झाल्याचे दिसते. त्या मुळे दुसर्या टप्यात एप्रिल मघ्ये साखर निर्यातीचा निण॔य होईल, आशी आपेक्षा महाराष्ट्राला होती.
पण, क्रेंद सरकारच्या अन्न व व्यापार मंञालयतील अधिकार्यांनी एप्रिलमघ्ये 336 लाख टनांपेक्षा आघिक सखार तयार झाली तर दहा लाख टनांच्या निर्यातीची विचार होऊ शकतो, आसे सुचित केले होते.

माञ, महाराष्ट्र व कर्नाटक राज्या मघ्ये साखर निर्मीतीत मोठी घट झाल्याने 330 लाख टनांवरच आकङा आङकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जागतिक बाजारातील तेजीमुळे देशांतग॔त दरामघ्ये शंभर ते दोनशे रूपयांची वाढ झाली आसुन, तेवढाच साखर उद्योगांना दिलासा मिळत आहे.
लंङन च्या बाजारपेठेत साखरेला दर 54 ते 55 हजार रू. प्रतिटनांवर गेलेला आहे. कारखान्याना आणि शेतकर्याला संधी होती. पण तो लाभ मिळु देत नाहीत आणि देशांतग॔त साखरेच्या बाजारात किरकोळ वाढ झाली तर त्यातही अडथळा निर्माण केला जात आहे.

साखरेला जागतिक बाजारात मागणी आहे.दरही जास्त मिळत आहे. पण केंद्र सरकार साखर निर्यात करू देत नाही. जर साखर निर्यात झाली असती तर प्रति क्विंटल ला निर्यात खर्च 700 रुपये वजा केला तरी 4800 रुपये क्विंटल ला दर मिळाला असता,शेतकऱ्यांना अजून 500 रुपये दुसरा हप्ता कारखान्यांनी दिला असता,
पण सरकारी धोरण आडवे येत आहे. साखरेला दर नाही म्हणून कारखाने दर देत नाहीत...
आता दर आहे पण निर्यात करू देत नाहीत म्हणून उसाला दर नाही.

२०/०४/२०२३

बीङ च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंङे यांचा मोठा निर्णय....

बीङ च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंङे यांनी मोठा निर्णय घेतला. तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया या दिवशी मोठ्या प्रमाणात बाल विवाह  होतात. ते रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत..

अक्षय तृतीया या दिवशी मोठ्या प्रमाणात बाल विवाह होत असल्याचे यापूर्वी देशात अनेक ठिकाणी समोर आले आहेत.दि.22 एप्रिल शनिवारी अक्षय तृतीया असून या सणाला बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार बीड जिल्ह्यात अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह होऊ नयेत यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, बालविवाहाचे आयोजन करणारे वधू व वर यांचे आई-वडील, नातेवाईक, भटजी, मंडपवाले, आचारी, वऱ्हाडी मंडळी या सर्वांवर गुन्हा नोंदविण्यात येईल, या आशयाची दवंडी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी मंगळवारी दिले.

बाल विवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधी असून, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे बाल विवाह बेकायदा ठरतात, याविरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात बाल विवाह होऊ नये यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, रॅली आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.


१९/०४/२०२३

अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावात लागली लाखो ची बोली.

 अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावात लागली लाखो ची बोली.....

चला तर मग, सविस्तर प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया..


अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावातील एका चहावाल्याची  सगळीकडेच चर्चा आहे. कारण, ही तसेच आहे. अवघ्या साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या गावात एका चहाच्या हॉटेल  तब्बल 30 लाखांची बोली लागली आहे. ग्रामपंचायतने बांधलेल्या चार व्यापारी गाळ्यांचा लिलाव झाला आणि याचवेळी एका गाळ्यासाठी 11 महिन्यांचे भाडे म्हणून चहाच्या हाॅटेल साठी चक्क 30 लाखांची बोली लावत गाळा मिळवला.

बीडच्या जिल्हा यात अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा हे छोटंस गाव आहे. दरम्यान गावाच्या ग्रामपंचायतचं उत्पन्न देखील काही खूप मोठं नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संबंधित ग्रामपंचायतने 10 बाय 12 आकाराचे चार गाळे बांधले होते. यातून काहीतरी आर्थिक उत्पन्न होईल म्हणून, ग्रामपंचायतने बांधलेले गाळे 11 महिन्याच्या करारावर भाड्याने देण्याच ठरवलं. यासाठी सोमवारी बोली लागली. तर या बोलीत  चहाची हाॅटेल, झेरॉक्स, सलून दुकानदारांनी सहभाग घेतला. पण यातील एक गाळ्याची बोली 30 लाखापर्यंत गेली. विशेष 30 लाखांची बोली लावणारा व्यक्ती हा एक चहा वाला होता. तर गावातील चहाच्या हाॅटेल साठी तब्बल 30 लाखाची बोली लागल्याने गावातील लोक आश्चर्यचकीत झाले..

• 25 लाखांची दुसरी बोली..

डोंगरपिंपळा येथील ग्रामपंचायतचा उत्पन्न वाढवण्यासाठी ग्रामपंचायतने चार गाळे बांधले. दरम्यान यासाठी अधिकृतरीत्या लिलाव आयोजित करण्यात आला. या लिलावात सहभाग घेण्यासाठी पाच हजारांची अनामत रक्कम घेण्यात आली. जवळपास दहा लोकं यात सहभागी झाले. सोमवारी लिलाव ठेवण्यात आला. लिलावात पुढे बोली सुरु झाली आणि वाढत गेली. पाहता-पाहता एकमेकांचे आकडेही वाढू लागले. दरम्यान या चार गाळ्याच्या लिलावात एका गाळ्याची किंमत चक्क लाखात गेली. पाहता-पाहता हा आकडा 20 लाखाच्या पुढे गेली. दरम्यान यावेळी एकाने चक्क 25 लाखाची बोली लावली. पण याचवेळी गावात चहाचं दुकान असलेल्या एका व्यक्तीने त्यापुढे जात थेट 30 लाखांची बोली लावली. त्याच्या 30 लाखाच्या बोलीच्यापुढे आणखी रक्कम वाढवण्याची इतर कोणाची हिम्मत झाली नाही, आणि शेवटी तीस लाखात गाळ्याचा लिलाव झाला. पण या लिलावा पेक्षा चहाच्या हाॅटेल वाल्याने तीस लाखांची बोली लावल्याचीच पंचक्रोशीत जोरदार चर्चा आहे.

१७/०४/२०२३

सरकार तुम्ही केलाय मार्केट जॅम. बीङ येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने लिहीले पञ Social Media वर धुमाकुळ..

गौतमी पाटील यांनी आत्मपरीक्षण  कराव...
(#गैतमी पाटील)
बीडमध्ये राहणाऱ्या किसानपुत्र श्रीकांत गडाले यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकला एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी गौतमी पाटीलला पत्र लिहित त्याचा फोटो शेअर केला होता. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्राद्वारे त्यांनी गौतमी पाटीलला ‘तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच तयार नाही’, असं म्हणत चांगलीच कानउघडणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत पाहायला मिळत आहे. तिच्या लावणीचा वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतर गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यात चर्चेतील नाव ठरलं आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने तिच्या आयुष्यातील भावी जोडीदाराबद्दल भाष्य केले होते. या मुद्द्यावरुन आता एका शेतकऱ्याच्या मुलाने तिला पत्र लिहिलं आहे.

किसानपुत्र श्रीकांत गडाले यांचे पत्र

“गौतमी पाटीलचे हाल बेहाल.....
तुमचे चाहते लाखो पण.. 
लग्नाला तयार कोणीच नाही.

आमच्या महाराष्ट्रात मुलगी लग्नाला आली की मुलाच्या घरचे मुलींच्या घराचे उंबरठे झिजवतात. तरी मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीला लग्न कर म्हणायची वेळ येत नाही.

गौतमी पाटील तुमचे लाखो चाहते पण....लग्नाला कोणीच तयार नाही. तुमचे ठुमके वर लाखो फिदा, 
पण लग्नाला कुणीच तयार नाही, जरा आत्मपरीक्षण करा.

या महाराष्ट्रात चटक मटक भाजी एक दिवस गोड लागते, पण पोट व मन भरायला चटणी भाकरी भाजी ठेचाच लागतो.

हा कृषिप्रधान देश आहे तुमच्या डान्सचे ठुमके कमी करा गौतमी पाटील तुम्ही आत्मपरीक्षण करा.

खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अयोध्येला निघालेत, महाराष्ट्रात विजेचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने पिके गेली, मुकी जनावरे गेली. तरी काही तरुण वर्ग तुमच्याच नादात असला आणि लाखो चाहते असले तरी एकही लग्नाला तयार नाही.

किसान पुत्र श्रीकांत गडळे सांगतात,
इतर शेतकरी पुत्र उपाशी राहतील कापसाला पाणी बकेटने मारतील पण लग्नाला कोणीच तयार होणार नाही. आत्मपरीक्षण करा”, असे किसानपुत्र श्रीकांत गडाले यांनी म्हटले आहे.

(किसान पुत्र श्रीकांत गडळे यांच्या वाॅल वरून)


Samsung galaxy S20 FE 5G ची किंमत आणखी कमी

 Samsung galaxy S20 FE 5G ची   किंमत आणखी कमी


Samsung galaxy S20 FE 5G तुम्ही कमी किमतीत Amazon वरून खरेदी करू शकता. तुम्हाला मोठी सवलत दिली जात आहे. फोन Amazonवर 60% डिस्काउंटसह सूचिबद्ध करण्यात आला आहे. फोनची MRP 74,999 रुपये आहे, तर सवलतीनंतर फोन केवळ 29,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे.

याशिवाय, यावर तुम्हाला बँक ऑफर्स देखील मिळत आहेत. Amazon Pay ICICI card ने व्यवहार केल्यास Easy EMIचा ऑप्शन देखील देण्यात आला आहे. याशिवाय, फोन सात दिवसांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीसह येणार आहे. यासह, एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे.

SBI Credit Card

Instant Bank Discount on EMI ordersUpto ₹1,000 offOffer 


Specifications

स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये 6.5 inch(16.40 centimeters) Infinity-O  Super AMOLED Display मिळतो, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.1080 x 2400 (FHD+) Resolution.या शिवाय, यामध्ये Qualcomm Snapdragon 865 Octa-Core Processor देखील देण्यात आला आहे. त्याबरोरबरच, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा (12MP+ 12MP+8MP) सेटअप मिळतो. या फोनसह तुम्हाला 5G नेटवर्क सपोर्ट मिळेल.


128GB internal memory expandable up to 1TB, Android 11.0 operating system and dual SIM
4500 mAh battery (Non -removable) with Super Fast Charging, FAst Wireless Charging & Finger Print sensor
IP68 Rated, MicroSD Card Slot Expandable upto 1 TB), Dual Nano Sim, Hybrid Sim Slot, 5G+5G Dual stand ....

१५/०४/२०२३

‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता आहारात नियमित ठेवा

‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता

कढीपत्ता आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अनोशेपोटी कढीपत्ता सेवन केल्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही संजीवनी आहे. नियमितपणे आहारात कढीपत्त्याचा समावेश केल्याने शरीरात अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

आपली पचनसंस्था नीट काम करत असेल तर शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही आणि वजनही कमी होते. कढीपत्ता खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते, त्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास होत नाही. याशिवाय कढीपत्ता खाल्ल्याने आतड्यांना फायदा होतो. त्यामुळे आपले पोट निरोगी राहते. या सर्व गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

रोज कढीपत्ता खाल्ल्याने तुमचे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते. कढीपत्ता चघळल्याने शरीर डिटॉक्स होते. यामुळे शरीरातील हानिकारक आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. कढीपत्ता कॅलरीज बर्न करते. याशिवाय शरीरावर चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. रोज सकाळी कढीपत्त्याचा रस प्यायल्याने तुमची ऊर्जा पातळी आणि चयापचय दोन्ही वाढते




वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता सर्वात प्रभावी आहे. कढीपत्ता वजन कमी करण्याचा रामबाण उपाय आहे. यामध्ये अल्कलॉइड्स असतात, ज्यात लठ्ठपणाविरोधी आणि लिपिड-कमी करणारे गुणधर्म असतात. कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाणही कमी होते, त्यामुळे वजन कमी होते.

कढीपत्त्यात लोह आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता तर असतेच, पण शरीरात रक्त योग्य प्रकारे शोषून न घेण्याशीही त्याचा संबंध असतो. फॉलिक अॅसिड हा एक आवश्यक घटक आहे जो रक्त शोषण्यास मदत करतो. जर तुम्हाला अॅनिमियाचा त्रास होत असेल तर त्यावर मात करण्यासाठी दररोज कङीपत्ता खा


१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो.
प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते.

२) जुलाब लागले असता, कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की,
‘पोटातल्या वेदना’ आणि ‘जुलाबाचे वेग’ वेगाने नियंत्रणात येतात.

३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो, त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत.

४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.

५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत.
याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.

७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.
 


८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत.
शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.

९) कर्करोगाने पिडीत रुग्ण ‘केमो’ आणि ‘रेडियो’ थेरपी घेत असताना, त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते. अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून खायला लावावीत. रुग्णाला बराच आराम मिळतो.

१०) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर, अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.

११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे ‘अमृत’ आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत
कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.

१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर, कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.

१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर, मिरी, आले आणि सैंधव मिसळून
कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत. याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.

१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात.
 

‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता आहारात नियमित ठेवा. कच्चा चावून खा.
आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.

१२/०४/२०२३

लातूर मघ्ये नेमकं चाललंय तरी काय.....!

लातूर मघ्ये नेमक चाललंय तरी काय.....?

संक्षिप्त स्वरूपात







न्यूज चॅनेल्सवर ब्रेक दरम्यान नांदेड, लातूर येथील कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींचा भडीमार दिसतो. हल्ली हे क्लासेसवाले अनेक शो स्पॉन्सर करू लागलेत. काहींनी तर सेलिब्रिटींना घेऊन प्रमोशन्स सुरु केलेत. कोट्यावधीत उत्त्पन्न असणाऱ्या या क्लासेसचा सक्सेस रेशो हा MPSC पेक्षाही कमी असतो. 

लाखो विद्यार्थी भरमसाठ पैसे घेऊन शिकवले जातात. त्यातील बॅनरवर बसतील एवढेच चांगल्या शाखेत प्रवेश मिळवतात. शिवाय त्यातील अनेकजण तर स्वतःच अभ्यास करतात. काही वेळा तर MBBS ला लागलेल्या मुलांच्या घरी जाऊन सेटलमेंट करून क्लासेसचे फॉर्म भरून घेतात. 

लातूरच्या क्लासेसबद्दल माहिती काढली तर लातूरच्या एका कोचिंग क्लासेसमध्ये 30 हजार विद्यार्थी शिकतात. वार्षिक फी 60-70 हजारांच्या घरात आहे. लातूरमध्ये 8-10 क्लासेस मिळून जवळपास 2500 कोटींची उलाढाल असल्याचे समजते. लातूरचा एक क्लासेसवाला वार्षिक 50 कोटी रुपये फक्त जाहिरातबाजीवर खर्च करतो. न्यूजचॅनल असो की, पेपर असो, की बसेस. याहीपेक्षा जास्त धक्कादायक म्हणजे लोकप्रतिनिधींना निवडणुकीला रसद सुद्धा हे क्लासेसवाले पुरवतात. छोट्या मोठ्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर आल्या की मॅनेज करतात. हे सगळे पैसे तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आहेत.

 यातील किती पैसा हा व्हाईट स्वरूपात दाखवला जातो ?

 किती प्रमाणात हे क्लासेसवाले टॅक्स भरतात, याचा लेखाजोखा हे देतात का ? ED-INCOME टॅक्स अधिकाऱ्यांचा इकडे कानाडोळा आहे का ? तुम्हाला आश्चर्य वाटेल की, इथे शिकवणाऱ्या काही शिक्षकांना वार्षिक 3 ते 4 कोटींचे पॅकेज दिले जाते, हा पैसा कशा स्वरूपात दिला जातो ते ही एक गौडबंगालच आहे. आमच्या वेळेस पण मुलं क्लासेस न करता सुद्धा MBBS ला लागायची, असली जाहिरातबाजी तेंव्हा नव्हती. भपकेबाज जाहिरातबाजीला वैतागून हे लिहले आहे. अजून एका ग्रुपच्या जाहिराती फार दिसतात त्यावरही जरा लिहावं लागेलच

पोस्ट साभार - 

Vaibhav Kokat

@ivaibhavk

महाराष्ट्र सरकारचा नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मोठी भरती.अर्ज करण्याची अंतिम तारीख..


महाराष्ट्र सरकारचा नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मोठी भरती. त्या संबंधी अधिसूचना जारी केलेली आहे. इछूकांनी ऑनलाइन अर्ज करावे. अर्ज करण्याची अंतिम मुदत एप्रिल 30, 2023 आहे.





एकूण जागा : 177 जागा

पदांची नावे : रचना सहायक (गट-ब)

शैक्षणिक पात्रता  : मान्यताप्राप्त संस्थेकडून स्थापत्य अभियांत्रिकी, नागरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी, आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञानातील तीन वर्षांची पदवी.

वय मर्यादा :18 ते 40 वर्षे

परीक्षा फीस : अराखीव प्रवर्गसाठी रु. 1000/- 
राखीव प्रवर्ग यांसाठी रु. 900/- इतका.

पगार : 36,800 ते 1,22,800/-

पुणे,कोकण,नागपूर,नाशिक,औरंगाबाद ,अमरावती या विभागामध्ये होणार भरती

अर्ज करण्याची अंतिम  तारीख 30 एप्रिल

जाहिरात:-













आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...