googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi: लातूर मघ्ये नेमकं चाललंय तरी काय..?
लातूर मघ्ये नेमकं चाललंय तरी काय..? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लातूर मघ्ये नेमकं चाललंय तरी काय..? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१२/०४/२०२३

लातूर मघ्ये नेमकं चाललंय तरी काय.....!

लातूर मघ्ये नेमक चाललंय तरी काय.....?

संक्षिप्त स्वरूपात







न्यूज चॅनेल्सवर ब्रेक दरम्यान नांदेड, लातूर येथील कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींचा भडीमार दिसतो. हल्ली हे क्लासेसवाले अनेक शो स्पॉन्सर करू लागलेत. काहींनी तर सेलिब्रिटींना घेऊन प्रमोशन्स सुरु केलेत. कोट्यावधीत उत्त्पन्न असणाऱ्या या क्लासेसचा सक्सेस रेशो हा MPSC पेक्षाही कमी असतो. 

लाखो विद्यार्थी भरमसाठ पैसे घेऊन शिकवले जातात. त्यातील बॅनरवर बसतील एवढेच चांगल्या शाखेत प्रवेश मिळवतात. शिवाय त्यातील अनेकजण तर स्वतःच अभ्यास करतात. काही वेळा तर MBBS ला लागलेल्या मुलांच्या घरी जाऊन सेटलमेंट करून क्लासेसचे फॉर्म भरून घेतात. 

लातूरच्या क्लासेसबद्दल माहिती काढली तर लातूरच्या एका कोचिंग क्लासेसमध्ये 30 हजार विद्यार्थी शिकतात. वार्षिक फी 60-70 हजारांच्या घरात आहे. लातूरमध्ये 8-10 क्लासेस मिळून जवळपास 2500 कोटींची उलाढाल असल्याचे समजते. लातूरचा एक क्लासेसवाला वार्षिक 50 कोटी रुपये फक्त जाहिरातबाजीवर खर्च करतो. न्यूजचॅनल असो की, पेपर असो, की बसेस. याहीपेक्षा जास्त धक्कादायक म्हणजे लोकप्रतिनिधींना निवडणुकीला रसद सुद्धा हे क्लासेसवाले पुरवतात. छोट्या मोठ्या निगेटिव्ह गोष्टी बाहेर आल्या की मॅनेज करतात. हे सगळे पैसे तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आहेत.

 यातील किती पैसा हा व्हाईट स्वरूपात दाखवला जातो ?

 किती प्रमाणात हे क्लासेसवाले टॅक्स भरतात, याचा लेखाजोखा हे देतात का ? ED-INCOME टॅक्स अधिकाऱ्यांचा इकडे कानाडोळा आहे का ? तुम्हाला आश्चर्य वाटेल की, इथे शिकवणाऱ्या काही शिक्षकांना वार्षिक 3 ते 4 कोटींचे पॅकेज दिले जाते, हा पैसा कशा स्वरूपात दिला जातो ते ही एक गौडबंगालच आहे. आमच्या वेळेस पण मुलं क्लासेस न करता सुद्धा MBBS ला लागायची, असली जाहिरातबाजी तेंव्हा नव्हती. भपकेबाज जाहिरातबाजीला वैतागून हे लिहले आहे. अजून एका ग्रुपच्या जाहिराती फार दिसतात त्यावरही जरा लिहावं लागेलच

पोस्ट साभार - 

Vaibhav Kokat

@ivaibhavk

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...