googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi: बीङ येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने लिहीले गैतमी पाटील ला पञ.
बीङ येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने लिहीले गैतमी पाटील ला पञ. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बीङ येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने लिहीले गैतमी पाटील ला पञ. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७/०४/२०२३

सरकार तुम्ही केलाय मार्केट जॅम. बीङ येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने लिहीले पञ Social Media वर धुमाकुळ..

गौतमी पाटील यांनी आत्मपरीक्षण  कराव...
(#गैतमी पाटील)
बीडमध्ये राहणाऱ्या किसानपुत्र श्रीकांत गडाले यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकला एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी गौतमी पाटीलला पत्र लिहित त्याचा फोटो शेअर केला होता. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्राद्वारे त्यांनी गौतमी पाटीलला ‘तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच तयार नाही’, असं म्हणत चांगलीच कानउघडणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत पाहायला मिळत आहे. तिच्या लावणीचा वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतर गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यात चर्चेतील नाव ठरलं आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने तिच्या आयुष्यातील भावी जोडीदाराबद्दल भाष्य केले होते. या मुद्द्यावरुन आता एका शेतकऱ्याच्या मुलाने तिला पत्र लिहिलं आहे.

किसानपुत्र श्रीकांत गडाले यांचे पत्र

“गौतमी पाटीलचे हाल बेहाल.....
तुमचे चाहते लाखो पण.. 
लग्नाला तयार कोणीच नाही.

आमच्या महाराष्ट्रात मुलगी लग्नाला आली की मुलाच्या घरचे मुलींच्या घराचे उंबरठे झिजवतात. तरी मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीला लग्न कर म्हणायची वेळ येत नाही.

गौतमी पाटील तुमचे लाखो चाहते पण....लग्नाला कोणीच तयार नाही. तुमचे ठुमके वर लाखो फिदा, 
पण लग्नाला कुणीच तयार नाही, जरा आत्मपरीक्षण करा.

या महाराष्ट्रात चटक मटक भाजी एक दिवस गोड लागते, पण पोट व मन भरायला चटणी भाकरी भाजी ठेचाच लागतो.

हा कृषिप्रधान देश आहे तुमच्या डान्सचे ठुमके कमी करा गौतमी पाटील तुम्ही आत्मपरीक्षण करा.

खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अयोध्येला निघालेत, महाराष्ट्रात विजेचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने पिके गेली, मुकी जनावरे गेली. तरी काही तरुण वर्ग तुमच्याच नादात असला आणि लाखो चाहते असले तरी एकही लग्नाला तयार नाही.

किसान पुत्र श्रीकांत गडळे सांगतात,
इतर शेतकरी पुत्र उपाशी राहतील कापसाला पाणी बकेटने मारतील पण लग्नाला कोणीच तयार होणार नाही. आत्मपरीक्षण करा”, असे किसानपुत्र श्रीकांत गडाले यांनी म्हटले आहे.

(किसान पुत्र श्रीकांत गडळे यांच्या वाॅल वरून)


आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...