googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi: अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावात लागली लाखो ची बोली.
अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावात लागली लाखो ची बोली. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावात लागली लाखो ची बोली. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१९/०४/२०२३

अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावात लागली लाखो ची बोली.

 अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावात लागली लाखो ची बोली.....

चला तर मग, सविस्तर प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया..


अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावातील एका चहावाल्याची  सगळीकडेच चर्चा आहे. कारण, ही तसेच आहे. अवघ्या साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या गावात एका चहाच्या हॉटेल  तब्बल 30 लाखांची बोली लागली आहे. ग्रामपंचायतने बांधलेल्या चार व्यापारी गाळ्यांचा लिलाव झाला आणि याचवेळी एका गाळ्यासाठी 11 महिन्यांचे भाडे म्हणून चहाच्या हाॅटेल साठी चक्क 30 लाखांची बोली लावत गाळा मिळवला.

बीडच्या जिल्हा यात अंबेजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा हे छोटंस गाव आहे. दरम्यान गावाच्या ग्रामपंचायतचं उत्पन्न देखील काही खूप मोठं नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी संबंधित ग्रामपंचायतने 10 बाय 12 आकाराचे चार गाळे बांधले होते. यातून काहीतरी आर्थिक उत्पन्न होईल म्हणून, ग्रामपंचायतने बांधलेले गाळे 11 महिन्याच्या करारावर भाड्याने देण्याच ठरवलं. यासाठी सोमवारी बोली लागली. तर या बोलीत  चहाची हाॅटेल, झेरॉक्स, सलून दुकानदारांनी सहभाग घेतला. पण यातील एक गाळ्याची बोली 30 लाखापर्यंत गेली. विशेष 30 लाखांची बोली लावणारा व्यक्ती हा एक चहा वाला होता. तर गावातील चहाच्या हाॅटेल साठी तब्बल 30 लाखाची बोली लागल्याने गावातील लोक आश्चर्यचकीत झाले..

• 25 लाखांची दुसरी बोली..

डोंगरपिंपळा येथील ग्रामपंचायतचा उत्पन्न वाढवण्यासाठी ग्रामपंचायतने चार गाळे बांधले. दरम्यान यासाठी अधिकृतरीत्या लिलाव आयोजित करण्यात आला. या लिलावात सहभाग घेण्यासाठी पाच हजारांची अनामत रक्कम घेण्यात आली. जवळपास दहा लोकं यात सहभागी झाले. सोमवारी लिलाव ठेवण्यात आला. लिलावात पुढे बोली सुरु झाली आणि वाढत गेली. पाहता-पाहता एकमेकांचे आकडेही वाढू लागले. दरम्यान या चार गाळ्याच्या लिलावात एका गाळ्याची किंमत चक्क लाखात गेली. पाहता-पाहता हा आकडा 20 लाखाच्या पुढे गेली. दरम्यान यावेळी एकाने चक्क 25 लाखाची बोली लावली. पण याचवेळी गावात चहाचं दुकान असलेल्या एका व्यक्तीने त्यापुढे जात थेट 30 लाखांची बोली लावली. त्याच्या 30 लाखाच्या बोलीच्यापुढे आणखी रक्कम वाढवण्याची इतर कोणाची हिम्मत झाली नाही, आणि शेवटी तीस लाखात गाळ्याचा लिलाव झाला. पण या लिलावा पेक्षा चहाच्या हाॅटेल वाल्याने तीस लाखांची बोली लावल्याचीच पंचक्रोशीत जोरदार चर्चा आहे.

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...