googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi: ‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता आहारात नियमित ठेवा

१५/०४/२०२३

‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता आहारात नियमित ठेवा

‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता

कढीपत्ता आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. अनोशेपोटी कढीपत्ता सेवन केल्याचे अनेक फायदे आहेत. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही संजीवनी आहे. नियमितपणे आहारात कढीपत्त्याचा समावेश केल्याने शरीरात अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

आपली पचनसंस्था नीट काम करत असेल तर शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही आणि वजनही कमी होते. कढीपत्ता खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते, त्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास होत नाही. याशिवाय कढीपत्ता खाल्ल्याने आतड्यांना फायदा होतो. त्यामुळे आपले पोट निरोगी राहते. या सर्व गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

रोज कढीपत्ता खाल्ल्याने तुमचे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होते. कढीपत्ता चघळल्याने शरीर डिटॉक्स होते. यामुळे शरीरातील हानिकारक आणि विषारी पदार्थ बाहेर पडतात. कढीपत्ता कॅलरीज बर्न करते. याशिवाय शरीरावर चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते. रोज सकाळी कढीपत्त्याचा रस प्यायल्याने तुमची ऊर्जा पातळी आणि चयापचय दोन्ही वाढते




वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता सर्वात प्रभावी आहे. कढीपत्ता वजन कमी करण्याचा रामबाण उपाय आहे. यामध्ये अल्कलॉइड्स असतात, ज्यात लठ्ठपणाविरोधी आणि लिपिड-कमी करणारे गुणधर्म असतात. कढीपत्ता खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाणही कमी होते, त्यामुळे वजन कमी होते.

कढीपत्त्यात लोह आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता तर असतेच, पण शरीरात रक्त योग्य प्रकारे शोषून न घेण्याशीही त्याचा संबंध असतो. फॉलिक अॅसिड हा एक आवश्यक घटक आहे जो रक्त शोषण्यास मदत करतो. जर तुम्हाला अॅनिमियाचा त्रास होत असेल तर त्यावर मात करण्यासाठी दररोज कङीपत्ता खा


१) आपण आहारात एक विशिष्ट सुगंधी चव यावी यासाठी कढीपत्ता वापरतो.
प्रत्यक्षात कढीपत्त्यामध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते.
त्यामुळे जेवण रुचकर लागते.

२) जुलाब लागले असता, कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप प्यायला की,
‘पोटातल्या वेदना’ आणि ‘जुलाबाचे वेग’ वेगाने नियंत्रणात येतात.

३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो. ज्यांना अजीर्णाचा सारखा त्रास होतो, जेवल्यावर अस्वस्थ वाटते, पोटात गॅस पकडतो, त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत.

४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे. नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत.

५) मधुमेही रुग्णांनी कढीपत्त्याची दहा-बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत.
याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित रहायला फार मदत होते.

७) कोलेस्टेरॉल वाढले असेल तर, कढीपत्त्याची वीस पाने अनशापोटी चावून खावीत.
 


८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत. केस पांढरे होत नाहीत.
शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते.

९) कर्करोगाने पिडीत रुग्ण ‘केमो’ आणि ‘रेडियो’ थेरपी घेत असताना, त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवरसुद्धा फार घातक परिणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते. अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखरेसोबत चावून खायला लावावीत. रुग्णाला बराच आराम मिळतो.

१०) सर्दी-खोकल्यासारखे आजार सारखे होत असतील तर, अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत.

११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे ‘अमृत’ आहे. कोणत्याही प्रकारच्या काविळीत
कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे.

१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर, कढीपत्त्याची कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो.

१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर, मिरी, आले आणि सैंधव मिसळून
कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावीत. याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही.

१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर, डोळ्यांचे विकार कमी होतात.
 

‘बहुगुणी’ आणि ‘आरोग्यसंपन्न’ कढीपत्ता आहारात नियमित ठेवा. कच्चा चावून खा.
आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...