googlea8f1cd8e2bfa4690.html google-site-verification=Wkw56QYe28rDa7xBfZK9dI2HE7otav80B06Y0saHpN8 SpandanMyMarathi: बीङ च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंङे यांचा मोठा निर्णय....

२०/०४/२०२३

बीङ च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंङे यांचा मोठा निर्णय....

बीङ च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंङे यांनी मोठा निर्णय घेतला. तीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया या दिवशी मोठ्या प्रमाणात बाल विवाह  होतात. ते रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत..

अक्षय तृतीया या दिवशी मोठ्या प्रमाणात बाल विवाह होत असल्याचे यापूर्वी देशात अनेक ठिकाणी समोर आले आहेत.दि.22 एप्रिल शनिवारी अक्षय तृतीया असून या सणाला बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार बीड जिल्ह्यात अक्षय तृतीया या दिवशी बालविवाह होऊ नयेत यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, बालविवाहाचे आयोजन करणारे वधू व वर यांचे आई-वडील, नातेवाईक, भटजी, मंडपवाले, आचारी, वऱ्हाडी मंडळी या सर्वांवर गुन्हा नोंदविण्यात येईल, या आशयाची दवंडी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी मंगळवारी दिले.

बाल विवाह ही प्रथा बाल हक्काच्या विरोधी असून, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार असे बाल विवाह बेकायदा ठरतात, याविरोधात गुन्हा नोंदविला जाणे अपेक्षित आहे. तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात बाल विवाह होऊ नये यासाठी जाणीव जागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, रॅली आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आता फक्त 15 रुपयात शेतकरी बांधव नवीन सौर पंपासाठी रजिस्ट्रेशन करू शकतात.

Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान मंञी कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासा...