जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांची भरती करण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागात लवकरच संचालक, उपसंचालक, सहायक संचालक इत्यादी पदांसाठी भरती सुरू होणार.
नाशिक जलसंपदा विभागात विविध पदांवर एकूण १,७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या जागा उपलब्ध आहेत. यापैकी ५० टक्के जागा रिक्त असून यामध्ये सहाय्यक अभियंता पदासोबत दफ्तर कारकून, कालवा निरीक्षक, कालवा चौकीदार, मोजणीदार, कॅनॉल निरीक्षक अशा विविध पदांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता या भरती प्रक्रियेत आणखी ४८२ पदांची वाढ करून एकूण ९८२ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी परीक्षार्थींनी मागणी केली आहे
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या औरंगाबाद परिमंडळात वर्ग ३ आणि ४ च्या मंजूर पदांपैकी ७५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. अशातच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने जलव्यवस्थापन, धरणे, कालव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, शेतीला पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जातात, तर जलसंपदा विभाग मोठी धरणे बांधण्याचे काम करतो. हे दोन्ही विभाग गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतात. शिवायया महामंडळातील अधिकारी, कर्मचारी दरमहा निवृत्त होत आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या विभागात पदभरती झालेली नाही. यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे एका अधिकाऱ्याकडे दोन किंवा अधिक पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदांचा अहवाल महामंडळाच्या दक्षता पथकाने नुकताच शासनास सादर केला आहे.
या भरतीमध्ये वरील पदे भरण्यात येणार आहेत. भरतीबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी जलसंपादन विभागाच्या
https://wrd.maharashtra.gov.in/
या अधिकृत बेवसाईटला नक्की भेट द्या.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय पारित झाला असून या अंतर्गत गट-क संवर्गातील अभियंता, लघुलेखक, सहायक अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत.